फलटण : फलटण शहरातील फ्रुट व्यापारी म्हणून परिचित असलेले तरुण फळ विक्रेते तनवीर बागवान यांचे दि. 26/05/2026 रोजी रात्री दुर्दैवी अपघातात निधन झाले.
बाजारपेठेत मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित असलेले तनवीर बागवान यांच्या निधनामुळे फलटण भाजीपाला मार्केट, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 26/05/2026 रोजी निंबळक (ता. फलटण) येथील बाजार आटोपून फलटणकडे येत असताना विडणी परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तनवीर बागवान यांचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईक व मित्र परिवाराकडून मिळाली आहे.
फलटणच्या तरुण फळ विक्रेते तनवीर बागवान यांचे अपघाती निधन
By Team LBNN
On: May 27, 2026 8:35 AM







