सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शहरावर शोककळा

On: July 19, 2026 10:33 AM
Follow Us:

फलटण : फलटण शहरातील  सामाजिक कार्यकर्ते, शरद पवार यांचे निष्ठावंत समर्थक आणि सामाजिक-राजकीय घडामोडींवर सातत्याने परखड भूमिका मांडणारे नंदकुमार मोरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच फलटण शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने मत व्यक्त करणारे नंदकुमार मोरे हे “हरित फलटण, सुंदर फलटण” हा पर्यावरणपूरक संदेश नेहमीच लोकांपर्यंत पोहोचवत असत. त्यांच्या लेखनशैलीमुळे आणि समाजाभिमुख भूमिकेमुळे त्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे ते अत्यंत विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते होते. फलटणमधील दिवंगत सुभाषराव शिंदे यांच्या समवेत त्यांनी अनेक वर्षे राजकीय आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशीही त्यांचा सातत्याने संपर्क होता.

फलटण शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर ते अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडत असत. समाजकारण, पर्यावरण आणि लोकहिताच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ सर्वपरिचित होती.

नंदकुमार मोरे यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

हे ही वाचा  फलटणच्या तरुण फळ विक्रेते तनवीर बागवान यांचे अपघाती निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!