सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

१२ वी निकालात फलटण मधील प्रोग्रेसिव्हचे यश ; १००% निकालाची परंपरा कायम!

On: May 3, 2026 5:41 PM
Follow Us:

फलटण- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाकडून फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या निकालात सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इंग्रजी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. यामध्ये कु. श्रावणी भानुदास धुमाळ हिने ८३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. पुनिता मोहनलाल पटेल हिने ७८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर संग्राम शाहूराज संकपाळ याने ७७.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवला.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थापक श्री भिमराव माने, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्ष सौ. सविता माने, सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका अहिल्या कवितके तसेच माधुरी माने यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.
या यशामुळे परिसरात संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वलभविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचा  फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची 'अनया पवार 'भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!