सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

महावीर स्तंभ चौकातील रस्ते कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; अधिकारी पाहणी करणार का?

On: June 2, 2026 2:31 PM
Follow Us:

फलटण – फलटण शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंतर्गत पालखी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील विविध भागांत या कामाची गती वाढविण्यात आली असली तरी फलटण नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महावीर स्तंभ चौकातील रस्ते कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  सुरू असलेल्या कामात दर्जेदार साहित्याचा वापर होत आहे का, तसेच काम नियमानुसार आणि तांत्रिक निकषांनुसार केले जात आहे का, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या कामाची संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे.
कोट्यवधी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कामाचा दर्जा, सुरक्षितता आणि पारदर्शकता यांना प्राधान्य दिले जावे, तसेच संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा  फलटण तालुक्याच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आणि आपण कटिबद्ध असून विकासकामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही - आमदार सचिन पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!