सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

महात्मा फुले जयंतीनिमित्त समता परिषद सातारा यांच्या वतीने फलटणमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

On: April 9, 2026 1:49 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ११ एप्रिल २०२६ रोजी फलटण येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते २ या वेळेत संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रभाकर पवार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, तर लता अनिलेश कर्णे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, साहित्यिक, पत्रकारिता व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच नव्याने निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ‘फुले विचारधारा’वर आधारित ‘फुलेची शाळा’ या लघुपटाचे प्रदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे.
समता परिषदेतर्फे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवावी, असे आवाहन समता परिषद सातारा यांच्या वतीने केले आहे.

हे ही वाचा  टंचाईच्या काळात फलटणच्या सूर्या एचपी गॅस एजन्सीचे आदर्श व्यवस्थापन; ११ हजार ग्राहक समाधानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!