सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

चक्रीच्या चक्रातून मुक्त होईल का फलटण? नव्या पोलीस निरीक्षक अरविंद काळेंकडे सर्वांची नजर!

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी उचलबांगडी करत तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या पोलीस निरीक्षकांसमोर शहरातील वाढलेले अवैध धंदे आणि बोकाळलेला चक्री जुगार थांबवण्याचे मोठे आव्हान आहे.मागील दोन वर्षांत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना हेमंतकुमार शहा यांच्या कारकीर्दीत मटका-जुगार, चक्री, तसेच अवैध धंदे, वाहतूक कोंडी, घरफोडी, चोरी, फसवणूक, छेडछाड, आणि वेश्या व्यवसाय अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या काळात काही गंभीर गुन्ह्यांवर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

शहरातील विविध भागात खुलेआम सुरू असलेल्या चक्री अड्ड्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. काही ठिकाणी तक्रारींनंतर केवळ कागदोपत्री कारवाई होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे इतर चक्री अड्ड्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचे बोलले जाते.चक्री या अवैध जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दररोज लाखोंची उलाढाल होते. ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणारी ही चक्री दिवसभर सुरू असते, आणि पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.फलटणकर आता नव्या पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या कार्यकाळाकडे आशेने पाहत आहेत. शहरातील अवैध धंद्यांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी काळे यांची नेमणूक फलटणला गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने केल्याचे सांगितले जात आहे. अरविंद काळे हे या विश्वासास पात्र ठरतील का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

हे ही वाचा  चुकीच्या आहारामुळे वाढणारी मूळव्याध एक दुर्लक्षित वेदना - डॉ. शिल्पा गांधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

error: Content is protected !!