सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण नगरपालिकेत मोठा राजकीय घडामोडींचा थरार; महायुतीचा झेंडा की नवा समीकरणबदल?

On: November 16, 2025 8:19 PM
Follow Us:
---Advertisement---

(सागर चव्हाण )फलटण –  दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये उमेदवारांची अंतिम यादी निश्चित न झाल्याने फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षित असा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या माध्यमातून सर्व जागा कमळ चिन्हावर लढवण्याचा आपला निर्णय आधीच स्पष्ट केला आहे. मात्र त्यांच्या प्रमुख विरोधकांपैकी असलेल्या राजे गटाने अद्याप चिन्हाबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. तरीही ते धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा वेग घेते आहे.

उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर चिन्हाबाबत भूमिका स्पष्ट कधी करणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे . खासदार गटातील काही इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत, परंतु त्यांचीही यादी जाहीर नाही.

यामुळे, खासदार गटात नगराध्यक्ष पदासह सदस्य पदांमध्ये  गोंधळ वाढला आहे. माजी खासदारांचे बंधू आणि माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. तर दिलीपसिंह भोसले यांना महायुतीतून कमळ चिन्हावर लढवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही.

यातच जर राजे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर सत्तेत असलेल्या महायुतीतीलच दोन प्रमुखपक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. परिणामी, विजयी जागाही महायुतीच्याच दोन वेगळ्या गटांमध्ये विभागली जातील.

फलटणमध्ये महाविकास आघाडीचेही अंतर्गत गणित जुळलेले नाही. आघाडी लढायची की स्वतंत्र, यावर स्पष्टता नसतानाच आज राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. श्रीमंत रामराजे धनुष्यबाणावर जाणार की महाविकास आघाडीला सोबत घेऊन मैदानात उतरणार, यावरचा निर्णय उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्याच स्पष्ट समजेल .

हे ही वाचा  फलटणमध्ये राजेगट फोडला पण मुंबईत रामराजेंनी नवीन प्लॅन आखला!! गेम चेंज होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

लक्ष्मी विलास येथे यंदा उत्साह नाही; अजित पवारांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा होणार नाही

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

error: Content is protected !!