सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे – मुख्याधिकारी निखिल जाधव

On: January 12, 2026 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---


फलटण – फलटण नगरपरिषदेच्या कर विभागामार्फत मोठ्या प्रमाणात थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून थकीत कराची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर मोहीम मा. मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली असून, कर अधिकारी श्री. राजेश काळे व कर निरीक्षक श्री. रोहित जमदाडे यांच्या नियंत्रणाखाली तीन स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.
वसुली पथकाकडून थकबाकीदार मालमत्ता धारकांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच, मालमत्ता धारक व नगरपरिषदेच्या मालकीचे गाळेधारक यांनी थकीत कराची रक्कम अदा न केल्यास गाळे सील करणे, जंगम मालमत्ता जप्त करणे तसेच नळ कनेक्शन बंद करणे यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
तरी, फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. अन्यथा कर वसुलीची ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येईल, याची सर्व थकीत मालमत्ता धारक व नगरपरिषदेच्या मालकीचे गाळेधारकांनी नोंद घ्यावी, असे फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांनी कळविले आहे.

हे ही वाचा  फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

छत्रपती शिवाजी वाचनालय वेळेत सुरू होत नाही; वाचकांची नाराजी

फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फलटणमधील जाहीर सभेच्या दिवशीच उघड्यावर जुगार! पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात

“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन

error: Content is protected !!