फलटण, प्रतिनिधी : शहरातील सर्वात मोठा आणि उत्साहपूर्ण होळी महोत्सव म्हणून ओळखला जाणारा ‘रंग उत्सव 3.0’ यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत पुणे रोडवरील प्राईड एलिट (जॅक्सन इन), निंभोरे येथे हा रंगोत्सव पार पडणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर तरुणाई, कुटुंबे आणि मित्रपरिवाराचा सहभाग अपेक्षित असून, आयोजकांनी सुमारे ३,००० ते ४,००० नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज व्यक्त केला आहे. सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात होळी साजरी करण्यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात लाईव्ह डीजे म्युझिक, ऑरगॅनिक व त्वचेला सुरक्षित रंग, विविध मनोरंजन उपक्रमांसह फन झोन, आकर्षक सेल्फी झोन तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशी विविध आकर्षणे असणार आहेत. कुटुंब, मित्र व कपल्स — सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.
प्रवेश शुल्क महिला ₹९९, पुरुष ₹१९९ तर कपल्ससाठी ₹२४९ निश्चित करण्यात आले आहे. मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर तिकीट बुक करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तिकीट बुकिंगसाठी 9607181650 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://rangutsav.adgraph.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
फलटणकरांनी या रंगतदार होळी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.












