फलटण : सातारा जिल्ह्यात पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून गारपिटीचीही दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव यांनी ही माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.













