बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जय पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
जय पवार म्हणाले की, अजित पवार यांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी काम केले आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही एकत्र होते, याची आठवण करून देत त्यांनी सर्वच पक्षांनी अजित पवारांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेतल्याचे नमूद केले.
दरम्यान, उमेदवारी माघारीनंतर जय पवार आणि आकाश मोरे यांच्यात हस्तांदोलन झाले. या घटनेतून बारामतीतील राजकारणात सौहार्द आणि समन्वयाचा संदेश दिला गेल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे बोलले जात आहे.









