सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

राज्यपालांची भेट घेत विजय थलपतींचा सत्ता स्थापनेचा दावा; उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!!

On: May 6, 2026 7:17 PM
Follow Us:

तामिळनाडू : अभिनेता व राजकारणी विजय थलपती यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने विजय थलपती यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसने पाठिंब्यासाठी संविधानविरोधी आणि जातीयवादी पक्षांना सत्तेत सहभागी न करण्याची अट ठेवली होती. विजय थलपती यांनी ही अट मान्य केल्याचेही बोलले जात आहे. तसेच आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, विजय थलपती उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर होणाऱ्या अधिवेशनात ते बहुमत सिद्ध करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचा  बारामती पोटनिवडणूक : सुनित्रा पवारांसमोर २२ जणांची लढत; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमआयडीसीच्या आश्वासनाची पूर्तता उद्या होणार का? उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटणमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम

विकासकामांत राजकारण आणणाऱ्या ‘त्या’ स्वयंघोषित समाजसेवकांचा डाव हाणून पाडणार : नगरसेविका कु. सिद्धाली शहा

पडद्यावरचा नायक ठरला तामिळनाडूचा जननायक! थलपती विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बारामती पोटनिवडणूक : सुनित्रा पवारांसमोर २२ जणांची लढत; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात

आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेताच जय पवारांची प्रतिक्रिया; ‘अजित दादांसाठी सर्व पक्षांनी आदरांजली म्हणून  ’

शोकाच्या पार्श्वभूमीवर आ. सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द

error: Content is protected !!