सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

एमआयडीसीच्या आश्वासनाची पूर्तता उद्या होणार का? उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटणमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम

On: May 26, 2026 3:18 PM
Follow Us:

फलटण : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी साखरवाडी ता. फलटण येथे झालेल्या जाहीर सभेत फलटणमध्ये अतिरिक्त एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सुमारे 277 हेक्टर क्षेत्रामध्ये योग्य मोबदला देत अतिरिक्त एमआयडीसी केली जाईल, असे जाहीर केले होते.

या घोषणेला आता जवळपास तीन महिने पूर्ण होत असून, फलटणकरांमध्ये अतिरिक्त एमआयडीसीबाबत उत्सुकता कायम आहे. दरम्यान, उद्या बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता कोळकी, फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवड आढावा, बीएल-2 नोंदणी अभियान तसेच फलटण नगर परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये अतिरिक्त एमआयडीसी संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत कोणती भूमिका मांडणार, तसेच फलटणकरांना दिलेल्या आश्वासनाबाबत काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  राज्यपालांची भेट घेत विजय थलपतींचा सत्ता स्थापनेचा दावा; उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!