सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

On: July 15, 2026 5:47 PM
Follow Us:

फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दि. १७ व १८ जुलै २०२६ रोजी फलटण शहर व परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पालखीसोबत असलेल्या वाहनांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याने विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
दि. १७ जुलै – पालखी मुक्कामासाठी वाहनांचा मार्ग
पालखी फलटण विमानतळावरील मुक्कामस्थळी येताना वाहनांनी खालील मार्गाचा वापर करावा:
तांबमाळ → चौधरवाडी उड्डाणपूल → सस्तेवाडी उड्डाणपूल → कांबळेश्वर उड्डाणपूल → धुळदेव उड्डाणपुलाखालून यू-टर्न → बारामती रोड उड्डाणपूल → सोमवार पेठ → नाना पाटील चौक → दहिवडी चौक → डी.एड. चौक → गिरवी नाका → पालखी मुक्काम (फलटण विमानतळ).
या संपूर्ण मार्गावर पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात राहणार असून बॅरिकेडिंग व वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दि. १८ जुलै – विडणी व बरडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
पालखी विडणी विसाव्याकडे रवाना होताना वाहनांनी खालील मार्गाचा वापर करावा:
दहिवडी चौक → कोळकी तिकटणे → सोनवडी → वडले (फौजीनगर) → माझेरी → विडणी पालखी विसावा.
पिंप्रद जेवणाच्या विसाव्यासाठी : वडले गावातून डावीकडे वळून पिंप्रदकडे जावे.
बरड मुक्कामासाठी : पिंप्रद मार्गे पुढे मिरडे फाटा येथून डावीकडे वळून बरडकडे जावे.
फलटण शहर पोलीसांनी नागरिक, वारकरी व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गांचे पालन करावे, वाहतूक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

हे ही वाचा  गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?

घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी

गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

error: Content is protected !!