सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसिया पटेल यांचे एकल उपोषण

On: July 19, 2026 11:51 AM
Follow Us:

धाराशिव : लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विविध मागण्यांना समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आसिया पटेल यांनी एकल उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही मोठ्या संघटनेचा पाठिंबा किंवा जमाव नसताना एकट्याच महिलेने सुरू केलेल्या या आंदोलनाची शहरभर चर्चा होत आहे.

सोनम वांगचुक यांच्यावरील कथित दडपशाहीचा निषेध तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये आसिया पटेल यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात असून, अनेक जण आंदोलनस्थळी भेट देऊन माहिती घेत आहेत. एकट्याच महिलेने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.

आसिया पटेल यांनी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावावेत आणि आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. हे उपोषण किती दिवस सुरू राहणार आणि त्याला पुढे किती प्रतिसाद मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!