फलटण – 20 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. त्यानंतर 28 जूनपासून लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अन्नत्याग उपोषण सुरू केले.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून या आंदोलनाबाबत कोणताही संवाद साधण्यात आला नाही. उपोषणाच्या 21व्या दिवशी, 18 जुलै 2026 रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की, त्यांनी रुग्णालयातही उपोषण सुरू ठेवले असून औषधोपचार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नीट (NEET) पेपर घोटाळ्यामुळे देशभरातील अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
या मागणीसाठी आज, 20 जुलै रोजी दिल्लीतील संसदेकडे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, कॉक्रोज जनता पार्टीचे समर्थक, कलाकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक राज्यांतील जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर विविध शासकीय कार्यालयांसमोर उपोषण, धरणे आणि निदर्शने आयोजित करण्यात असल्याची माहिती मिळत आहे.
आज दिल्लीच्या संसदेवर मोठा मोर्चा; देशभरातून गावपातळीवरुन पाठिंबा
By Team LBNN
On: July 20, 2026 8:28 AM












