सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आज अजित पवार असते तर नक्कीच या आंदोलनावर व्यक्त होत सरकारवर त्यांनीही नाराजी दाखवली असती…

On: July 22, 2026 9:05 AM
Follow Us:

22 जुलै विशेष

फलटण : दिल्लीमध्ये आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले आहे. देशभरातील छोट्या शहरापासून मोठ्या शहरांपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.  लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर ज्या प्रकारे पोलिसांनी लाठीचार्ज केला, पंधरा-पंधरा वर्षांच्या मुलींना, शामिल झालेल्या व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली करत आहेत , त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस बळाचा गैरवापर करत भाडोत्री फौजफाटा उभा करून तरुणांना मारण्यासाठी त्यांच्या हातात काठ्या दिल्या आणि त्या काठ्या मुलांच्या छाताडावर, तसेच मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर मारल्या गेल्या. यामुळे देशभरात सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

नीट पेपरफुटीमुळे देशभरात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आवाज उठला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली.

सुरुवातीस अभिजीत यांनी नेतृत्व केले. त्यानंतर पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे अन्नत्याग उपोषणावर अजूनही ठाम आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनातून सोनम वांगचुक यांना हटवण्यात आले आणि बळजबरीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असा आरोप केला जात आहे.

सरकारने किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी आंदोलकांशी कोणतीही चर्चा केली नाही. उलट हे आंदोलन कसे चिघळेल, याचीच सरकार वाट पाहत आहे का? जो देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो, त्या देशातील तरुण-तरुणींवर आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवल्यामुळे लाठीचार्ज केला जातो, त्यांना रक्तबंबाळ केले जाते.

संपूर्ण देशभरात सरकारच्या विरोधात जनमत जात असताना, 56 इंच छातीवाले आणि नेहमी ‘मन की बात’ करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या युवाशक्तीचा आवाज ऐकू येत नाही का? देशातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक व्हावी आणि पेपरफुटी थांबावी यासाठी सरकार चर्चा करू शकत नाही का? राजीनामा नंतरची गोष्ट आहे, पण भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांचे मत ऐकून घेऊ शकत नाही का?

आंदोलन करणाऱ्या विरोधकांना उचलले जात आहे. ज्या जनतेने देशाची सत्ता दिली, त्या जनतेला आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? असे अनेक प्रश्न आज देशासमोर उभे आहेत.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात असते, तर नक्कीच या आंदोलनावर व्यक्त होत त्यांनीही सरकारवर नाराजी दाखवली असती…..

हे ही वाचा  डेक्कन चौकातून जाताना आजही आढाव सरांची आठवण हमखास येते

संपादकीय : सागर चव्हाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!