टाळ, चिपळ्या, मृदुंगात
सारे भक्त दंग होई,
पांडुरंगा भेटायाची
जीवा लागलीया घाई..
गळा तुळशीमाळ
भाळी चंदनाचा टिळा
धावा करीत रिंगणात
चाले भक्ताचा हा मेळा..
चाले नाचत पालखी
गाठते तो दिवेघाट
मुखी नाम विठ्ठलाचे
चालते पंढरीची वाट..
राहो मुखी सदा
नाम विठ्ठलाचे
गरळ नष्ट व्हावे
समुळ पापाचे..
एकदातरी करावी
पंढरपुराची वारी
आयुष्याची ईच्छा
होईल मग पुरी..
निलेश दिगंबर तुरके
मु आटमुर्डी पो वाढोणा बाजार
ता राळेगाव जी यवतमाळ
पिन कोड ४४५४०२
मोबाईल ७७४१८७७१७४
वारी
By Team LBNN
On: July 25, 2026 10:44 AM










