फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील बसस्थानकांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण बसस्थानकाला भेट दिली होती. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानकासाठी विशेष एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंत्री सरनाईक यांनी ३१ ऑगस्टपूर्वी बसेस उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता.
दिलेला शब्द पूर्ण करत फलटण आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण आगारात या बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई कांबळे, पंचायत समिती सदस्य राहुल नरुटे, शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू नाना इवरे, विकास शिंदे, नगरसेवक विकास काकडे सर, पप्पू शेख, स्मिता शहा, कविता मदने, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, दीपक गायकवाड, फलटण आगार प्रमुख मुल्ला मॅडम, आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सुखदेव अहिवळे आदी उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मागणीला प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याने आगाराच्या बससेवेत वाढ झाली आहे. नवीन बसेसमुळे फलटण व परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली आणि नियमित एसटी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, फलटण आगारासाठी आणखी काही बसेस उपलब्ध होणे बाकी असून, त्या देखील लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.










