सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

AIच्या माध्यमातून बिबट्याचे बनावट फोटो-व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई; ३ वर्षांपर्यंत कारावास, १ लाखांपर्यंत दंड

On: September 3, 2026 2:27 PM
Follow Us:

फलटण : सातारा वनविभागांतर्गत फलटण वनपरिक्षेत्रात मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. AI सॉफ्टवेअर व विविध ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचे बनावट फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

AIच्या माध्यमातून एडिट केलेले किंवा बनावट फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.

तसेच बिबट्याबाबत अफवा पसरवणे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे किंवा खोटी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे यांसारखी कृत्ये कायद्याच्या कक्षेत येत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कारावास तसेच १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी दिली.

नागरिकांनी सोशल मीडियावरील बिबट्यांशी संबंधित कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

हे ही वाचा  फलटण व आदर्कीत वनसेवा केंद्रांची स्थापना; नागरिकांना मिळणार जलद १३ सेवा : वनपरिक्षेत्राधिकारी निकिता बोटकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!