सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

On: September 9, 2026 10:34 AM
Follow Us:

फलटण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर तसेच शहरालगतच्या पंचक्रोशीतील सर्व भाजी विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या सूचनेनुसार सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांनी केले आहे.

दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सव साजरा होत असल्याने फलटण शहरात गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांनी महात्मा फुले चौक ते माळजाई मंदिर गेट (मुधोजी क्लबकडील बाजू) या निश्चित ठिकाणीच स्टॉल उभारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजीचा आठवडी बाजार हा गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह ते बी.एस.एन.एल. ऑफिस रोड, कामगार वसाहत या परिसरात भरविण्यात येणार आहे.

सर्व भाजी विक्रेत्यांनी या बदलाची नोंद घेऊन फलटण नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांनी केले आहे.

हे ही वाचा  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?

घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी

आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

error: Content is protected !!