लोकशाही भारत न्यूजतर्फे गणेशभक्तांना आवाहन
प्रतिनिधी |
गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर लोकशाही भारत न्यूजतर्फे घरगुती गणपती उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या घरातील श्री गणपती बाप्पांच्या स्थापना सोहळ्याचा आकर्षक फोटो लोकशाही भारत न्यूजकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणपती स्थापना १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत असून, अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या कालावधीत आपल्या घरातील गणपती स्थापना सोहळ्याचे आकर्षक फोटो पाठविता येणार आहेत.
प्राप्त झालेल्या छायाचित्रांमधून सर्वात आकर्षक गणेशोत्सव स्थापना छायाचित्राची निवड करून ते लोकशाही भारत न्यूजच्या आगामी दिवाळी विशेषांकात (पुस्तकात) संबंधित व्यक्तीचे नाव व पत्त्यासह प्रकाशित करण्यात येणार आहे. विशेषांक आकर्षक भेटवस्तूसह संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे.
गणेशभक्तांनी आपले छायाचित्र लोकशाही भारत न्यूजच्या अधिकृत WhatsApp क्रमांक 9370729808 वर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाही भारत न्यूज
जनतेचा आवाज, लोकशाहीचा विश्वास!
“www.lokshahibharat.com”
घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी
By Team LBNN
On: September 14, 2026 4:08 PM












