सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

On: September 27, 2026 7:57 AM
Follow Us:

फलटण (प्रतिनिधी) : जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात संपन्न होणार्‍या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आणि राज्यभरात साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वतीने ‘नांदी संमेलनांची’ मालिका सुरू आहे. याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मसाप शाखा फलटणच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण येथे १० व्या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या निमित्ताने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनासाठी फलटणसह माण व खंडाळा तालुक्यातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती दोन प्रतींमध्ये ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, खजिना हौदानजिक, फलटण येथे पाठवाव्यात, असे आवाहन मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे. या ग्रंथ प्रदर्शनासाठी फलटण, खंडाळा व माण तालुक्यातील साहित्यिकांनी आपली ग्रंथसंपदा पाठवावी, तसेच या साहित्यिकांचे यथोचित स्वागत संमेलनामध्ये करण्यात येणार असल्याने साहित्यिकांनी या उपक्रमासाठी भरघोस प्रतिसाद द्यावा असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ग्रंथ प्रदर्शन संयोजक तथा मसाप फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे (98607 54457), मसाप फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे (99227 78386) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही रवींद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

हे ही वाचा  पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

बजाजनगर येथे रामरक्षा आंदोलन; अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार

error: Content is protected !!