सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

बजाजनगर येथे रामरक्षा आंदोलन; अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार

On: July 18, 2026 10:26 AM
Follow Us:


छत्रपती संभाजीनगर, समाधान बक्षी

   : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीतील कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राज्यभर सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरजवळील बजाजनगर येथे रामरक्षा पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
बजाजनगर येथील वडगाव कोल्हाटी रस्त्यावरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आंदोलनात उपस्थित शिवसैनिक व रामभक्तांनी कथित भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण, मारुती स्तोत्र व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम व मारुतीरायांची महाआरती करण्यात आली. मंत्रोच्चार व जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
यावेळी तालुकाप्रमुख विष्णू जाधव, शिक्षक सेनेचे ज्येष्ठ नेते पद्माकर इंगळे, माजी महापौर सुदाम सोनवणे, सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, श्रीरंग आपटे, हिरालाल सलामपुरे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आउलवार, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती चोपरिसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनाचे व महाआरतीचे नियोजन शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाला बजाजनगर व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, भाविक व रामभक्त उपस्थित होते. उपस्थितांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली.

हे ही वाचा  डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

घराबाहेरील विद्युत प्रवाह ठरला जीवघेणा; काही क्षणांत शिंदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू

error: Content is protected !!