सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे बिनविरोध, नितीन पाटलांचाही मार्ग मोकळा

On: October 6, 2026 5:48 PM
Follow Us:

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी एक मतदारसंघ बिनविरोध झाला आहे. उदयनराजेंच्या विरोधातील उमेदवार ज्ञानेश्वर पवार यांनी राजगादीचा मान राखत अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. तर दुसरी जागाही बिनविरोध होण्याची शक्यता असून राज्यसभा खासदार नितीन पाटलांच्या विरोधातील दीपक ननावरे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला. त्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे गृहनिर्माण, दुग्ध विकास संस्था मतदारसंघातून बिनविरोध झाले असून बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार नितीन पाटील हे वाई तालुका सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण पाटील यांच्या मतदारसंघात असलेला अन्य एक उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरू होत्या. त्याचे पहिले ठोस फलित दोन खासदारांच्या बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले आहे. आता आणखी कोणते उमेदवार माघार घेतात आणि कोण रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामध्ये विद्यमान अध्यक्षांसह तीन संचालक आणि एकूण सात जणांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कायद्याचा काथ्याकूट केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज सकाळी त्यांनी निकाल जाहीर केला. विद्यमान अध्यक्षांनीही विरोधी उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्यानुसार दीपक ननावरे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला आणि खासदार नितीन पाटील यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा  सातारा जिल्हा रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात नागरिकांची गैरसोय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!