सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फक्त ₹१,००१ मध्ये संपूर्ण कुटुंबाच्या नावाने माळजाई देवीचा अभिषेक; समितीचा भाविकांसाठी विशेष उपक्रम!

On: October 14, 2026 12:05 PM
Follow Us:

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आयोजित नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त श्री माळजाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वात मंदिरात दररोज सकाळी श्री माळजाई देवीचा विधिवत अभिषेक व पूजाविधी करण्यात येतो.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांतील सकाळच्या अभिषेकांचे आगाऊ नियोजन करण्यात आले असून, सर्व दिवसांचे अभिषेक बुक झाले आहेत. यापूर्वी अभिषेकासाठी ₹३,१०० इतकी देणगी निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक भाविकांना आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने देवीचा अभिषेक करण्याची इच्छा असते. भाविकांची ही श्रद्धा आणि इच्छा लक्षात घेऊन समितीच्या वतीने केवळ ₹१,००१ देणगीमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या नावाने विधिवत अभिषेक करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या सुविधेअंतर्गत संबंधित भाविकांच्या संपूर्ण कुटुंबाच्या नावाने श्री माळजाई देवीचा विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच अभिषेकानंतर भाविकांना देवीचा प्रसाद आणि अभिषेकाची पावतीही देण्यात येईल.

फलटण शहर, परिसर तसेच तालुक्यातील सर्व भाविकांनी या धार्मिक उपक्रमाचा लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी श्री माळजाई देवीच्या चरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  मला धमकी आल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं? - तुकाराम मुंडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!