सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

धाडसी कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

On: May 1, 2026 6:52 PM
Follow Us:

मुंबई – मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह हे मानाचे पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी डिजीटल अरेस्ट करून वृध्द लोकांना लुबाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला होता.
र.अ. की. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत दि. २८/०९/२०२५ रोजी अनोळखी इसमांनी एटीएस कंट्रोल, न्यु दिल्ली तसेच एन.आय.ए. येथून वरिष्ठ अधिकारी श्री. सदानंद दाते तसेच इतर वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून पीएमएलए व पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याने आपणास डिजिटल अरेस्ट करून फिर्यादीस व्हिडीओ कॉलवर स्थानबद्ध केल्याचे भासवून एकूण ७० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अनोळखी इसमांविरुद्ध गु.र.क. ३५८/२०२५, कलम २०४, २०५, ३०८ (२), ३०८ (३), ३१८ (२), ३१९ (२), ३३६ (२), ३४० (२), ३५१ (२), ३ (५) भा.न्या.सं. सह कलम ६६ (क), ६६ (ड) आय.टी. अॅक्ट २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या बँक खात्यामधून हस्तांतर झालेल्या विविध बँक खात्यांची कागदपत्रे तपासून परराज्यात कार्यरत असलेल्या टोळीची माहिती प्राप्त झाली. गुन्ह्यात वापरलेल्या लॉगिन डिटेल्स व इतर तांत्रिक बाबींवरून गुजरात व राजस्थान येथे अहोरात्र १४ दिवस सापळा रचून एकूण ०६ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील रक्कम क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यूएस डॉलरमध्ये रूपांतर करणाऱ्या आणखी एका आरोपीस अटक करण्यात आली. अशा एकूण ०७ आरोपींना अटक करून आंतरराष्ट्रीय लिंक असलेली टोळी उघडकीस आणण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपींचा महाराष्ट्र सायबर यांच्याकडील तपास असलेल्या ५८ कोटी रुपयांच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक योगेश बाबुराव खरात यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांनी त्यांना प्रवर्ग २ या सदराखाली दरोडेखोर / गुन्हेगारांच्या टोळ्या किंवा अघोर व तंत्रबद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल यावर्षी अतिशय सन्मानाचे पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविले आहे.

हे ही वाचा  फलटण तालुक्यात घरगुती गॅस वितरणावर प्रशासनाचे लक्ष; तहसीलदारांकडून दैनंदिन अहवाल जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!