सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

वाचन प्रेरणा घेऊन जयंती साजरी करूया – नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर

On: April 16, 2026 10:20 PM
Follow Us:

फलटण : वाचन संस्कृती जोपासूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, या उद्देशाने जयंती साजरी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करून त्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे. भविष्यात आणखी अद्ययावत वाचनालये उभारण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
भीमज्योत जागृती प्रतिष्ठान, मलठण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, किरण राऊत तसेच युवा नेते प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान निवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, ग्रंथमित्र आबासाहेब यादव आणि महाराष्ट्र पोलिस दलातील मयुरी चव्हाण यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. सुरुची बडेकर व श्रावस्ती अहिवळे यांनी मानपत्र वाचन केले.
प्रमुख वक्ते ॲड. आकाश आढाव यांनी महापुरुषांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत समाजपरिवर्तनासाठी प्रेरणा दिली. तसेच दुःखमुक्तीसाठी पंचशील व विपश्यना विद्या यांचे महत्त्व स्पष्ट करत स्वरचित कवितांमधून प्रबोधन केले.
यावेळी अंतरा बल्लाळ व दिक्षा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर तनिष्का गायकवाड हिने भीमगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास आनंदराव कदम, डॉ. प्रभाकर भोसले, कृष्णाप्पा बनसोडे, महादेव गवळी, विठ्ठल मोरे, दादासाहेब गायकवाड, साईबाबा अहिवळे, घनश्याम मोरे, मनिषा जगताप, शांताबाई वाघमारे, रेखा अहिवळे, लेखिका प्रतिक्षा आढाव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण गायकवाड, प्रशांत कांबळे, संजय बडेकर, अशोक रणदिवे, अनिल बल्लाळ, निलेश गायकवाड व विकी आढाव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र अहिवळे यांनी केले, तर आभार संग्राम बल्लाळ यांनी मानले.

हे ही वाचा  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

error: Content is protected !!