सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकमान्य मेडिकल फाउंडेशनतर्फे 21 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

On: June 20, 2026 8:29 PM
Follow Us:

फलटण – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2026 रोजी लोकमान्य मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिरात जनरल सर्जन व गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. इंद्रजीत यादव तसेच स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. पूर्णा यादव रुग्णांची तपासणी करतील. पोटाचे आजार, पित्ताशयातील खडे, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर, तसेच स्त्रीरोग, वंध्यत्व, मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे आजार आणि थायरॉईडसंबंधित समस्यांवर सल्ला व उपचार दिले जाणार आहेत.

याशिवाय, रक्त व लघवी तपासणी अल्प दरात आणि दुर्बिणीद्वारे तपासणी (गरजू रुग्णांसाठी मोफत) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे शिबिर 21 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत डॉ. बी. के. यादव यांचे लोकमान्य नर्सिंग होम, एमएसईबी शेजारी, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 7588059259 आणि 9284239432 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे ही वाचा  कच्ची फळे रसायनांनी पिकवण्याच्या प्रकारांमुळे आरोग्य धोक्यात; साताऱ्यात FDA च्या धडक कारवाईची गरज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

तरुणांमध्येही वाढतोय कॅन्सरचा धोका? शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका!

फक्त ₹11 ची वस्तू ₹325 ला! रुग्णालयाच्या बिलात नेमकं काय चाललंय? रुग्णांची होणारी ही पिळवणूक कधी थांबेल?

फलटणमध्ये वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर, पुणे (WICC) तर्फे कर्करोग विभागाची ओपीडी सेवा

आपली फलटण मॅरेथॉन २०२६ : दशकपूर्ती वर्षात २५ ऑक्टोबरला फलटण धावणार; ७५० हून अधिक रुग्णांची विशेष वॉकॅथॉन

कच्ची फळे रसायनांनी पिकवण्याच्या प्रकारांमुळे आरोग्य धोक्यात; साताऱ्यात FDA च्या धडक कारवाईची गरज

तुकाराम मुंडे यांचा मोठा प्रहार; निकृष्ट तूप, बनावट खवा आणि रासायनिक फळांवर FDA ची धडक कारवाई – सातारा जिल्ह्यातही होणार का अशीच मोहीम?

error: Content is protected !!