फलटण : कर्करोगाच्या रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला व उपचाराची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर, पुणे (WICC) यांच्या कर्करोग विभागातर्फे फलटण येथे विशेष ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ओपीडी सेवेमध्ये डॉ. अनूप ताम्हणकर, डॉ. सानिका कुलकर्णी-दोशी , डॉ. इंद्रजीत यादव आणि डॉ. जॉर्जिना ढालवाले रुग्णांना वैद्यकीय सल्ला देणार आहेत.
सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ओपीडी सेवा उपलब्ध राहणार आहे.
फलटण येथील लोकमान्य नर्सिंग होम आणि लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ओपीडीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल येथे MJPJAY शासकीय योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कर्करोगासंबंधी तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला व पुढील उपचारासाठी रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9890361070
फलटणमध्ये वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर, पुणे (WICC) तर्फे कर्करोग विभागाची ओपीडी सेवा
By Team LBNN
On: September 15, 2026 5:48 PM












