सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मोटारसायकल चोरी करणारे आरोपी फलटण शहर पोलिसांच्या जाळ्यात

On: April 8, 2026 1:03 PM
Follow Us:

फलटण -फलटण येथील कसबा पेठ, ब्राम्हण गल्ली येथील गणेश अपार्टमेंटसमोर पार्क केलेली सुमारे ₹४५,००० किंमतीची Honda Activa (क्र. MH.11.DJ 4487) ही दुचाकी २६ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० ते २७ मार्च रोजी सकाळी ७.०० या कालावधीत चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी तक्रारदार भारत काशिनाथ डोंबे (वय ५५, रा. कसबा पेठ, फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ११०/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक तुषार दोषी , अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली. प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी यश संदीप ढालपे (वय २३, रा. शिवाजीनगर, फलटण) व प्रफुल्ल चंद्रकांत हरीहर (वय २६, रा. मंगळवार पेठ, फलटण) यांनी चौकशीदरम्यान दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली स्कुटी तसेच गुन्ह्यात वापरलेली विनानंबर Hero Splendor मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राणी फाळके करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष नाळे, मुकेश घोरपडे, अतुल बडे व राणी फाळके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

हे ही वाचा  फलटणमध्ये चक्री जुगाराचा सुळसुळाट! तरुणाई आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त; पोलिसांचे मौन आश्चर्यकारक!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!