सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटणसाठी १२३० घरकुलांचे उद्दिष्ट; नागरिकांनी लाभ घ्यावा – मुख्याधिकारी निखिल जाधव व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांचे आवाहन

On: April 15, 2026 7:22 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटणसाठी १२३० घरकुलांचे उद्दिष्ट; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
फलटण : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत लाभार्थी नेतृत्व बांधकाम (BLC) या घटकांतर्गत फलटण नगरपरिषदेकडे एकूण २१० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९९ घरकुलांना गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण ३५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
फलटण शहरासाठी या योजनेअंतर्गत शासनाकडून एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे पक्के घर मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तरी फलटण शहरातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र नागरिकांनी या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. निखील जाधव तसेच नगराध्यक्ष मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी तसेच अर्ज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन मिळविण्यासाठी नागरिकांनी फलटण नगरपरिषद येथील प्रधानमंत्री आवास योजना कक्षास भेट द्यावी, असेही आवाहन फलटण करण्यात आले आहे.

हे ही वाचा  “मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहीत; पानंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला” – आमदार सचिन पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!