सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

एडवोकेट बापूसाहेब शिलवंत – अजीम मेटकरी यांच्या प्रभावी मांडणीसमोर न्यायालयाची दखल; पोलिसांना FIR चे आदेश

On: November 15, 2025 12:18 PM
Follow Us:

फलटण – झडकबाईचीवाडी,फलटण–पुसेगाव रोड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील दादासाहेब गायकवाड यांना शासनमान्य मंजुरीनंतर बांधकाम व तांत्रिक तपासणी पूर्ण झालेला हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप ताब्यात देण्यात आला होता. मात्र पंप सुरू होण्यापूर्वीच 23 सप्टेंबर 2024 रोजी काही व्यक्तींनी जमाव करून जातीवाचक शिवीगाळ करत मुख्य रस्ता काटेरी तारेने अडवून आर्थिक नुकसान केल्याची तक्रार गायकवाड यांनी पोलिसांकडे केली .

गायकवाड यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, 26 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण येथे, तसेच 24 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे वारंवार तक्रारी दिल्या. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अर्ज क्र. 32/2025 अंतर्गत विशेष न्यायालय फलटण येथे धाव घेतली. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 175(3) नुसार संबंधित आरोपींवर एफआयआर नोंदविण्याचे स्पष्ट आदेश फलटण ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. तसेच 15 डिसेंबर 2025 पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या प्रकरणी अर्जदार गायकवाड यांच्यातर्फे एडवोकेट बापूसाहेब शीलवंत व एडवोकेट अजीम मेटकरी यांनी प्रभावीरीत्या मांडणी केली. “ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, कायद्याचे पालन करून व्यवसाय करण्याचा हक्क मिळवलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकावरील गंभीर अन्याय आहे,” असे मत एडवोकेट शीलवंत यांनी व्यक्त केले. विशेष न्यायालयाच्या आदेशामुळे आता पोलिसांकडून तत्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक झाले असून पुढील कायदेशीर चौकशी सुरू होणार आहे.

हे ही वाचा  कातरखटाव गटात अभयसिंह जगताप यांच्या प्रचाराचा झंझावात!गावा-गावात राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाच्या उमेदवारांचे जोरदार स्वागत!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!