फलटण : फलटण येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नंदकुमार मोरे यांचे थोरले चिरंजीव लखन मोरे यांची भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळमधील काठमांडू येथे होणाऱ्या प्रथम साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, पुरुष संघाचे नेतृत्व लखन मोरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा २० ते २२ मे दरम्यान पार पडणार आहे.
लखन मोरे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून, आता भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फलटणमधील विविध सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून लखन मोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फलटणच्या लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड
By Team LBNN
On: May 20, 2026 10:47 AM







