सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण बाजार समितीत कांद्याला तेजी; घडिया ब्रदर्स यांच्या अडतीवर प्रतिक्विंटल ३ हजारांचा उच्चांकी दर

On: June 30, 2026 5:22 PM
Follow Us:

फलटण – कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजारात मंगळवारी दि. ३० जून रोजी झालेल्या कांदा लिलावात बाजारभाव तेजीत राहिले. दर्जेदार कांद्याला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याने प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला.

आज बाजार समितीत कांद्याची एकूण १ हजार ७४८ क्विंटल म्हणजे ३ हजार ४९६ पिशव्या इतकी आवक झाली. लिलावात कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल ३ हजार रुपये आणि सरासरी १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

विशेष म्हणजे मे. घडिया ब्रदर्स यांच्या अडतीवर विक्रीस आलेल्या कांद्याला दिवसातील प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काही दिवस बाजारभावातील तेजी कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा  श्रीराम सहकारी साखर कारखान्याने फलटण तालुक्यातील ऊस दर ३३०० रुपये देऊन कोंडी फोडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!