फलटण – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या कार्यकर्त्यांची अति महत्त्वाची बैठक शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता फलटण येथील शासकीय विश्रामगृह (कोर्टासमोर) येथे संपन्न झाली.
या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील गावागावांत शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या १० ते १५ दिवसांत तालुका व शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीस विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारुडा, तरडगावचे नितीन काकडे, युथचे सागर लोंढे, विशाल मोहिते, तेजस काकडे, राहुल काकडे, नितीन अहिवळे, पप्पू खराटे, दादा मोरे, सागर दशके, परवीन शेळके, पारधी समाजाचे कबूल शिंदे, बाळासाहेब डोईफोडे, श्रीमती विमलताई काकडे, फलटण तालुका अध्यक्षा मीनाताई काकडे, उपाध्यक्षा अलका बनसोडे तसेच महिला पदाधिकारी व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार
By Team LBNN
On: July 26, 2026 10:43 AM












