सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आपली फलटण मॅरेथॉन २०२६ : दशकपूर्ती वर्षात २५ ऑक्टोबरला फलटण धावणार; ७५० हून अधिक रुग्णांची विशेष वॉकॅथॉन

On: September 14, 2026 8:49 AM
Follow Us:

फलटण : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मॅरेथॉनचे दशकपूर्ती वर्ष असून, रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथून या आरोग्य चळवळीला सुरुवात होणार आहे.

यंदाच्या मॅरेथॉनची थीम ‘Run for Health & Happiness’ अशी असून, ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण आणि बालकांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध गट आणि अंतरांची आखणी करण्यात आली आहे. जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आरोग्याचा संदेश तसेच अवयवदानाचा संदेश देण्यावरही यंदा विशेष भर देण्यात आला आहे.

७५० हून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण रुग्णांची विशेष वॉकॅथॉन

यंदाच्या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे ‘विठू रोबो’ रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किलोमीटरची वॉकॅथॉन होणार आहे. भारतातील अशा प्रकारची ही पहिल्यांदाच होणारी वॉकॅथॉन असल्याचा आयोजकांचा दावा आहे.

२१, १० आणि ५ किलोमीटर धावण्याची संधी

मॅरेथॉनमध्ये १८ ते ६४ वयोगटातील सहभागी आपल्या क्षमतेनुसार २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अंतराच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतात.

वयोगट पुढीलप्रमाणे आहेत :

१८ ते ३० वर्षे – जोशपूर्ण युवा गट

३१ ते ४५ वर्षे – सळसळती तरुणाई

४६ ते ५५ वर्षे – प्रगल्भ प्रौढ

५६ ते ६४ वर्षे – अनुभवी ज्येष्ठ


याशिवाय १२ वर्षांवरील सहभागींसाठी ३ किमी Fun Run आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य ३ किमी Walkathon आयोजित करण्यात आली आहे.

विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे

पहिल्या चार वयोगटांमध्ये पुरुष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रथम क्रमांक – ₹१०,०००
द्वितीय क्रमांक – ₹७,०००
तृतीय क्रमांक – ₹५,०००

अशा प्रकारे एकूण ६० बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रत्येक रनरसाठी मॅरेथॉन किट

मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रनरला आकर्षक टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि उपयुक्त सरप्राइज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे. धावपटूंसाठी मार्गावर हायड्रेशनची सुविधाही उपलब्ध असणार आहे. मॅरेथॉनपूर्वी झुंबा वॉर्मअप आणि धावणीनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉनचा मार्ग ऊस शेती, बागा आणि द्राक्षमळ्यांमधून जाणारा निसर्गरम्य असणार आहे.

१४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होणार असून, ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी शुल्क :

पुरुष – ₹७५० + कर

महिला – ₹५०० + कर

३ किमी Fun Run – ₹३००

६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ३ किमी Walkathon – नोंदणी शुल्क नाही


[ऑनलाइन नोंदणी करा]https://alpharacingsolution.com/e/apli-phaltan-marathon-2026

‘चला एकत्र येऊ, नाचू, चालू आणि पळू; आरोग्यपूर्ण जीवनाकडे सगळे मिळून एक पाऊल पुढे टाकू!’ असा संदेश देत फलटणकरांनी या आरोग्य चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटणच्या कर्मचारीवर्गाने केले आहे.

हे ही वाचा  तुकाराम मुंडे यांचा मोठा प्रहार; निकृष्ट तूप, बनावट खवा आणि रासायनिक फळांवर FDA ची धडक कारवाई - सातारा जिल्ह्यातही होणार का अशीच मोहीम?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!