सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

हिंदी भाषेच्या संवर्धनातून राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी : डॉ. परशुराम रगडे;मुधोजी महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा

On: September 28, 2026 8:26 PM
Follow Us:

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील हिंदी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास कला व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, ता. कोरेगाव येथील डॉ. परशुराम रगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम होते.

यावेळी प्रो. डॉ. प्रभाकर पवार, प्रो. डॉ. नितीन धावडे, डॉ. सविता नाईक निंबाळकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. परशुराम रगडे यांनी मार्गदर्शन करताना मानवी जीवनातील प्रगती आणि परस्पर संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. “राष्ट्रभाषेशिवाय राष्ट्र हे मुख्य माणसासारखे असते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय समाजाच्या एकात्मतेमध्ये हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक भारतीयाने हिंदी भाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि आत्मीयता बाळगली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हिंदी भाषेचा विकास, तिची समृद्ध साहित्यिक परंपरा आणि राष्ट्रीय जीवनातील योगदान याविषयी बोलताना त्यांनी कबीर, तुलसीदास, सूरदास, रविदास, प्रेमचंद, महादेवी वर्मा आणि राजेंद्र यादव यांसारख्या साहित्यिकांच्या योगदानाचा उल्लेख केला. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी हिंदीसह विविध भारतीय भाषांनी दिलेल्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

जागतिकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हिंदी भाषेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्रशासन, शिक्षण, विविध व्यवहार आणि समाजमाध्यमांमध्ये हिंदीचा वापर वाढत असून रोजगाराच्या विविध संधींसाठीही हिंदी भाषा उपयुक्त ठरत आहे, असे डॉ. रगडे यांनी सांगितले. अमेरिकेतील विविध महाविद्यालयांमध्ये हिंदीचे अध्यापन केले जाते तसेच जगातील अनेक देशांमध्ये हिंदीचा वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय संविधानातील कलम ३४३ ते ३४८ यामध्ये हिंदी आणि अधिकृत भाषेशी संबंधित तरतुदींचा समावेश असल्याचे सांगून राष्ट्रीय एकात्मता आणि भाषिक समन्वयाच्या दृष्टीने हिंदीच्या भूमिकेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेवर प्रेम करावे, तिच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करावा आणि बदलत्या काळातील हिंदी भाषेशी संबंधित रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. नितीन धावडे यांनी करून दिला. प्रा. किरण सोनवलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी आभार मानले.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरण लाभले. हिंदी भाषेच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा जागर करणाऱ्या वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला.

हे ही वाचा  इंग्रजीची भीती दूर करा ; आजच प्रवेश निश्चित कराNobel spoken English Academy Phaltan

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!