सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

On: October 6, 2026 10:34 PM
Follow Us:

फलटण : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना केवळ व्यासपीठ देणे एवढ्यापुरताच युवा महोत्सव मर्यादित नसून, त्यांच्या आजकालच्या बदलत्या परिस्थितील तणावमुक्ती व सर्जनशीलतेला दिशा देत कलात्मक अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला शास्त्रीय अधिष्ठान देणारे हे प्रभावी विचारपीठ आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्रीमती.ज्योती जाधव यांनी केले.

फलटण एज्युकेशन, सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा मंगळवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी दिमाखदार वातावरणात शुभारंभ झाला. मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या उद्घाटक समारंभात उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. श्रीमती ज्योती जाधव बोलत होत्या. विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू विकसित करण्यासाठी युवा महोत्सवाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह सर्व स्तरातील विद्यार्थी वर्ग व विविध क्षेत्रातील लोक अनेक प्रकारच्या तणावाखाली वावरताना दिसतात या तणावातून मुक्त होऊन आणि आनंदी जीवन जगणे मोलाचे असते.महाविद्यालयीन युवा वर्ग आज अभ्यासासह करिअर गुणप्राप्ती, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२०, आंतरविद्याशाखीय विषयांची विविधता यांना समोरा जात आहे,क्रमिक अभ्यास, अभ्यासत्तेर व कौशल्याआधारित,आणि मानवविकास मूल्यांचे शिक्षण घेत असताना रोजगार निर्मितीयुक्त व नोकरीच्या संधी शोधात भारतीय ज्ञानप्रणाली समजून घेत दिशादर्शक प्रवास करत आहे, हे सर्व करताना, संगीत कला,खेळ,नृत्य,नाटक,चित्रकला,अभिनय,वक्तृत्व साहित्य इ. प्रकारातील सादरीकरणातून करियर घडविण्यासाठी ,“युवा महोत्सवातून तणावमुक्ती सर्जनशीलतेला आयुष्य चांगले आणि विकसित करण्यासाठी शास्त्रीय अधिष्ठान मिळते त्यामुळे आत्मविश्वास वृद्धिंगंत होतो, असे त्यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका मांडली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या या सांस्कृतिक विचारपीठाचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी युवा महोत्सवाच्या व्यापक महत्त्वाकडे लक्ष वेधले. प्रा. डॉ. जे. पी. जाधव यांच्या मनोगतातून युवा महोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व आज आपल्याला समजले, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यामध्ये युवा महोत्सवाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी संधी मिळणे आवश्यक आहे. मध्यवर्ती युवा महोत्सव मुधोजी महाविद्यालयात होत आहे, हा फलटण आणि मुधोजी महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
मध्यवर्ती युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महोत्सवासाठी एकूण ३३६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे महोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून विविध कला प्रकारांमधून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत असल्याचे जाणवले.
या कार्यक्रमास पुढील मान्यवरांची उपस्थितीमध्ये
प्रा.डॉ. सुरेखा आडके मॅडम, डॉ.आर. एच. अतिग्रे — कोल्हापूर जिल्हा समन्वयक व सदस्य, डॉ. देवानंद सोनटक्के — सातारा जिल्हा समन्वयक व सदस्य, तसेच युवा महोत्सव समिती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते.यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अशोक दोशी, संजय भोसले, नितीन शेठ गांधी, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ,शकील सय्यद,नितीन शांतीलाल गांधी,हेमंत रानडे,प्रा. सी. डी. पाटील,डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य,रणजित निंबाळकर, तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य उपस्थित होते.

हे ही वाचा  कातरखटाव गटात अभयसिंह जगताप यांच्या प्रचाराचा झंझावात!गावा-गावात राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाच्या उमेदवारांचे जोरदार स्वागत!!

कार्यक्रमाचे आभार मध्यवर्ती युवा महोत्सवाचे समन्वयक प्रो. डॉ. टी. पी. शिंदे यांनी मानले.स्वागताच्या मान्यवरांची नामावली प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी वाचली.प्रा.संग्राम निंबाळकर व प्रा. निलम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

कला-संस्कृतीने मुधोजी परिसर भारावला

६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या युवा महोत्सवात संगीत, समूहगीत, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय व सुगम गायन, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, मूकनाट्य, नक्कल, पथनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, लघुपट, छायाचित्रण, रांगोळी, मेहंदी, मातीकाम, कागदकाम, व्यंगचित्र, स्थळचित्रण, सर्जनशील लेखन आदी विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी सहभागी होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मुधोजी महाविद्यालयाचा परिसर सध्या युवा ऊर्जा, कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेने भारावून गेला आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारामुळे फलटणमध्ये चार दिवसांचा
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध समित्यांचे पदाधिकारी कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!