सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत रामराजेंच्या सूचक इशाऱ्यानंतर राजे गटात युवा कार्यकर्ते राहुल पवार (आरडी) यांचा प्रवेश

On: November 14, 2025 11:18 PM
Follow Us:

फलटण – नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. अलीकडेच राजे गटातील काही कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केल्यानंतर, बीबी ता. फलटण येथील कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी संयमी पण सूचक अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

कार्यक्रमात बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले, “हाताची मूठ सेल सोडल्यानंतर रिकामी राहत नाही; ती पुन्हा भरते.त्याप्रमाणे तरुण कार्यकर्ते कधी तयार झाले हे तुमच्या लक्षातही आले नाही.”

याच कार्यक्रमानंतर लगेचच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे, श्री सह्याद्री कदम यांच्या उपस्थितीत सोमवार पेठ फलटण शहरातील नामवंत युवा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पै.राहुल रमेश पवार (आरडी) यांचा राजे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे वडील श्री रमेश पवार सह बंधू रोहन पवार,सुरज पवार यांचाही प्रवेश झाला.

राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘आरडी मित्र समूह’च्या माध्यमातून शहर व तालुक्यात मोठा युवा वर्ग सक्रिय आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राजे गटाला फलटण नगरपालिका निवडणुकीसह फलटण पंचायत समिती,सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नक्कीच बळ मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा  स्मार्ट मीटर प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!