सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे

On: September 6, 2026 9:44 PM
Follow Us:

फलटण : फलटण येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. सुकुमार कांबळे यांनी महाराष्ट्रात मातंग समाज एकत्र येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “महाराष्ट्रात मातंग समाज एक झाल्याचे समाधान आहे. मातंग समाजाला हक्काचा पक्ष झाला असून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा मातंग समाजाच्या आधारावर निर्माण झालेला पक्ष आहे. या पक्षामध्ये आपल्या सोबत इतर समाजातील घटकांनाही सोबत घ्या,” असे आवाहन त्यांनी केले.

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांवर भाष्य करताना प्रा. कांबळे म्हणाले, “जे मागासवर्गीयांचे नेते म्हणून घेत होते, ते आता अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत. त्यामुळे आता ते एका जातीतच बंदिस्त झाले आहेत.”

“बौद्ध समाजाच्या नेत्यांनी आरक्षण सर्वांना वाटून द्या, अशी भूमिका घेतली असती तर बौद्ध समाजाच्या नेत्यांकडे आणि पक्षांकडे पुन्हा नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती. मात्र विरोध केल्याने ती आता हातातून गेली आहे,” असेही प्रा. कांबळे म्हणाले.

मातंग समाजाच्या सामाजिक परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील ८० टक्के गावांमध्ये मातंग समाजाला समाजमंदिर आणि स्मशानभूमी नाही.” स्पर्धेच्या युगात मातंग समाज आणि इतर घटक टिकून राहण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, एवढीच आमची मागणी आहे,” असे प्रा. सुकुमार कांबळे यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय परिषदेला मोठी उपस्थिती

या सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश आवळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगळे, फलटण तालुकाध्यक्ष निलेश घोलप, फलटण शहराध्यक्ष रोहित आडगळे आणि शहर युवा अध्यक्ष आदित्य पाटोळे यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके, विजय भोंडवे, रामभाऊ पाटोळे, राजन खिलारे, रामदास जाधव, महादेव खुडे, विजय पाटोळे यांच्यासह डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि सामाजिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणावर ठाम; फलटणमध्ये 20 सप्टेंबरला तालुकास्तरीय बैठक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका; आझाद मैदानातील मातंग समाजाचा निर्धार मोर्चा लेखी आश्वासनानंतर तात्पुरता स्थगित

सातारा जिल्ह्यातून हजारो मातंग समाजासह इतर घटक समाजातील बांधव मुंबईच्या सामाजिक न्याय महामोर्चात सहभागी होणार

मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणावर ठाम; फलटणमध्ये 20 सप्टेंबरला तालुकास्तरीय बैठक

आरक्षण उपवर्गीकरण हा संविधानिक न्याय; मातंग समाज आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा इतिहास नोंद घेईल : अजिंक्य चांदणे

फलटण येथे शनिवारी आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद

मातंग समाजाने हिंमत आणि धैर्य ठेवून वर्गीकरणाचा लढा लढावा – अजिंक्य चांदणे

error: Content is protected !!