सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका; आझाद मैदानातील मातंग समाजाचा निर्धार मोर्चा लेखी आश्वासनानंतर तात्पुरता स्थगित

On: September 30, 2026 1:39 PM
Follow Us:

मुंबई | आझाद मैदान : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात भव्य ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात आला.

रात्री उशिरापर्यंत समाजबांधव आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात ठामपणे उपस्थित होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्याचे मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून समाजबांधवांशी चर्चा केली.

यावेळी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत आगामी काळात सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी लेखी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या वतीने दिल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. तसेच हा प्रश्न मार्गी लावताना सर्व घटकांना विश्वासात घेऊन, कोणावरही अन्याय होणार नाही, अशा सर्वसमावेशक पद्धतीने तो सोडवला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

शासनाकडून मिळालेल्या या लेखी आश्वासनानंतर समाजातील ज्येष्ठ नेतृत्व व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, अजिंक्य चांदणे, प्रा. सुकुमार कांबळे, विष्णूभाऊ कसबे, राजेश घोडे यांच्यासह हजारो मातंग समाजबांधव आणि इतर संबंधित घटकांतील बांधव उपस्थित होते.

कालच्या महामोर्चाची शासनाने दखल घेतल्याने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर आगामी काळात राज्य सरकारकडून महत्त्वाची कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा  सातारा जिल्ह्यातून हजारो मातंग समाजासह इतर घटक समाजातील बांधव मुंबईच्या सामाजिक न्याय महामोर्चात सहभागी होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!