सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंतांच्या गुगलीने फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे वजन वाढलं! उमेदवारीच्या स्वप्नाने अनेकांची उडाली झोप!!

On: November 11, 2025 3:05 PM
Follow Us:
---Advertisement---

(सागर चव्हाण )फलटण – नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रारंभ झाल्यानंतरही स्थानिक नेत्यांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर माजी विधान परिषद सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

श्रीमंत रामराजे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात, तर मी फलटण नगरपालिकेचा नगराध्यक्ष का होऊ शकत नाही?”
या विधानाने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठीची आपली तयारी सूचित करत एकप्रकारे राजकीय गुगलीच टाकली आहे. परिणामी, फलटणमधील नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक नेत्यांची झोपच उडाली असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

दरम्यान, खासदार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन प्रमुख नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. सोशल मीडियावर श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि श्री. दिलीपसिंह भोसले यांच्या समर्थनार्थ विविध व्हिडिओ आणि संदेश व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, राजे गटाकडून श्रीमंतांनी गुगली टाकल्यानंतरही श्रीमंत अनिकेतराजेंचं नाव ९९ टक्के निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, जर श्रीमंत रामराजे स्वतःच मैदानात उतरले, तर खासदार गटासाठी ही निवडणूक कठीण होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा  पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

राज्यात सत्तेत, पण साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालयातून’ शिवसेना-राष्ट्रवादी आऊट!

पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

लक्ष्मी विलास येथे यंदा उत्साह नाही; अजित पवारांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा होणार नाही

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

error: Content is protected !!