सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकशाही भारत न्यूजच्या दिवाळी विशेषांकासाठी लेख, कविता व साहित्य पाठविण्याचे आवाहन

On: September 27, 2026 10:53 AM
Follow Us:

“लेखनाला व्यासपीठ, साहित्याला सन्मान आणि वाचकांशी थेट संवाद!”

फलटण/सातारा : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त लोकशाही भारत न्यूजचा दिवाळी विशेषांक २०२६ प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेषांकासाठी लेखक, साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, शिक्षक, विद्यार्थी तसेच नवोदित लेखकांकडून लेख, कविता, कथा आणि विविध प्रकारचे दर्जेदार साहित्य मागविण्यात येत आहे.

तसेच, विशेषांकाच्या मुखपृष्ठासाठी आकर्षक व दर्जेदार छायाचित्रेही मागविण्यात येत आहेत. छायाचित्रे दिवाळी, संस्कृती, परंपरा, ग्रामीण जीवन, निसर्ग, कला किंवा महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असावीत

या विशेषांकामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ग्रामीण जीवन, शेती, महिला सक्षमीकरण, युवा, उद्योग, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि वैचारिक विषयांवरील लेखनाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे ही वाचा  १९८० Trend": आपण खरंच भूतकाळात परत जायला लागलो आहोत का? इतके एकटे पडलो आहोत का आपण या आधुनिक जगात

दिवाळी विशेषांकासाठी लेख, कविता किंवा साहित्य पाठविणाऱ्या निवडक साहित्यिकांना लोकशाही भारत न्यूजचा दिवाळी विशेषांक २०२६  घरपोच पाठविण्यात येणार आहे.

साहित्य पाठविताना पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, गाव/शहर आणि संक्षिप्त परिचय अवश्य पाठवावा.

📱 साहित्य पाठविण्यासाठी WhatsApp : 9370729808

📅 लेखन व साहित्य स्वीकारण्याची अंतिम दिनांक : १० ऑक्टोबर २०२६

साहित्यिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले लेखन पाठवावे, असे आवाहन लोकशाही भारत न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!