मुंबई : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त लोकशाही भारत न्यूजच्या वतीने ‘आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६ प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेषांकासाठी लेख, कविता, कथा आणि विविध प्रकारचे दर्जेदार साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्रभरातील मराठी साहित्यिक, लेखक आणि नवोदित साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी आपले साहित्य प्रकाशनासाठी पाठविले आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर साहित्याची निवडही करण्यात आली आहे.
या विशेषांकासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ग्रामीण जीवन, शेती, महिला सक्षमीकरण, युवक, उद्योग, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि वैचारिक विषयांवरील लेखनाला प्राधान्य देण्यात येत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात येत होते. आता साहित्य स्वीकारण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक आहे. दिवाळीच्या उत्सवाची धामधूम आणि विशेषांकाच्या छपाईपूर्वीची कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता लक्षात घेता, साहित्यिकांनी आपले लेख, कविता, कथा व इतर साहित्य आजच पाठवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
१० ऑक्टोबर २०२६ ही साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतर कोणतेही साहित्य स्वीकारले जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
तसेच, ‘आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६ साठी ज्या साहित्यिकांच्या साहित्याची निवड करण्यात आली आहे, त्यांनी आपला आयडी साइज (पासपोर्ट साइज) फोटो स्वतःच्या पूर्ण नावासह WhatsApp वर पाठवावा. विशेषांकामध्ये साहित्यिकांची योग्य ओळख आणि सादरीकरण करता यावे, यासाठी संबंधितांनी आपला फोटो लवकरात लवकर पाठवावा.
साहित्य पाठविताना लेखकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, गाव किंवा शहर आणि संक्षिप्त परिचय अवश्य नमूद करावा.
📱 साहित्य व फोटो पाठविण्यासाठी WhatsApp : 9370729808
महाराष्ट्रातील साहित्यिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून ‘आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६ अधिक समृद्ध करावा, असे आवाहन लोकशाही भारत न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे.
आपले साहित्य, आपली लेखणी आणि आपल्या महाराष्ट्राचा साहित्यिक ठेवा — ‘आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६!
‘लोकशाही भारत न्यूज आद्य दीपोत्सव’ दिवाळी विशेषांक २०२६ साठी साहित्य पाठविण्याची आज आणि उद्या शेवटची संधी!
By Team LBNN
On: October 9, 2026 11:36 AM












