सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये ६ ऑक्टोबरला ऐतिहासिक ‘नांदी संमेलन’; पूर्वतयारीसाठी १६ सप्टेंबरला साहित्यिकांची बैठक

On: September 14, 2026 8:35 AM
Follow Us:

फलटण : जानेवारी २०२७ मध्ये पुणे येथे होणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि राज्यभर साहित्यिक वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वतीने ‘नांदी संमेलनांची’ मालिका आयोजित करण्यात येत आहे.

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी फलटण शहरात भव्य ‘नांदी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या नियोजनासाठी फलटण शहर व तालुक्यातील साहित्यिक, लेखक, कवी आणि व्याख्यात्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही पूर्वतयारी बैठक बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात होणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ राहणार आहेत. यावेळी श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधी सौ. अलका बेडकिहाळ फलटणच्या साहित्यिकांना संमेलनाच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यात होणाऱ्या मुख्य १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून समर्थ युवा फाऊंडेशनचे प्रमुख राजेश पांडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या पुढाकारातून संपूर्ण महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशात मिळून एकूण ९९ नांदी संमेलने आयोजित केली जात आहेत. मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीचा जागर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

फलटण येथे होणारे नांदी संमेलन या मालिकेतील महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून, त्यातून फलटणच्या समृद्ध साहित्यिक परंपरेला नव्याने उजाळा मिळणार आहे.

या नांदी संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, संमेलनात सक्रिय सहभागी होणाऱ्या स्थानिक साहित्यिकांना पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विशेष ‘बॅच’चे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे फलटणच्या साहित्यिकांना ऐतिहासिक शंभराव्या साहित्य संमेलनाशी थेट जोडले जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे फलटण शहर व तालुक्यातील सर्व लेखक, कवी, व्याख्याते, साहित्यप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी बुधवार, १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वतयारी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे आणि कार्यवाह अमर शेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

हे ही वाचा  लोकशाही भारतचा चौथा वर्धापन दिन; “आनंदी जीवन” विशेषांकाचे प्रकाशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!