सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सोमवारपेठ व मलटण येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्या उद्घाटन

On: March 13, 2026 10:02 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण शहरातील सोमवारपेठ व मलटण येथे सुरू करण्यात येत असलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि फलटण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता व फिरंगाई मंदिराशेजारी, सोमवार पेठ येथे तसेच सकाळी ११ वाजता मलटण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  सहा महिन्यांत अनियंत्रित मधुमेह पुर्णपणे नियंत्रणात, गोळ्यांची पूर्ण सुटका!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!