सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

कृष्णानगरमध्ये सांडपाण्याचा प्रश्न गंभीर; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

On: April 26, 2026 2:32 PM
Follow Us:


बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते MIDC रस्त्यावर दुर्गंधी; प्रशासनाकडून दुर्लक्ष


सातारा – बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते एम आय डी सी या मुख्य रस्त्यावर सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा भाग त्रिशंकू स्वरूपाचा असल्यामुळे मूलभूत नागरी सुविधांचा अभाव जाणवत असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडून या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या परिसरात नटराज मंदिर, सरकारी बँक, जात पडताळणी कार्यालय तसेच मोठी नागरी वस्ती आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील गुरुशिल्प अपार्टमेंट परिसरातून सांडपाणी कायम रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही समस्या सुटली नसल्याने नागरिक जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, दारूबंदी विभाग व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा  भटक्या कुत्र्यांवर फलटण नगरपालिकेची प्रभावी मोहीम; पालखी सोहळ्यापूर्वी रेबीज लसीकरण व नसबंदीला वेग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!